vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा,इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; 6 जण ठार, पुन्हा युद्ध भडकणार?

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा,इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; 6 जण ठार, पुन्हा युद्ध भडकणार?

 

विदेश प्रतिनिधी –

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा आहे. मात्र युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इराणकडून सतत बॉम्बहल्ला केला जात आहे. इस्त्रायलच्या सुरक्षा विभागाने सांगितलं आहे की, इराणने एका तासाच्या आत तीन वेळा मिसाईल हल्ला केला आहे, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तेल अवीवमध्ये सतत सायरन वाजत असून, लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. अशा परिस्थितीत खरंच शस्त्रसंधी झाली आहे का? अशी विचारणा होत आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत हल्ला करणार’इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ताज्या हल्ल्याबद्दल बोलताना सांगितलं की, आमचं शक्तिशाली लष्कर अखेरच्या मिनिटापर्यंत इस्त्रायलला त्याच्या हल्ल्याची शिक्षा देईल. ते म्हणाले की, “सर्व इराणी नागरिकांसह मी आपल्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानतो जे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाची सुरक्षा करण्यास तयार असतात, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला उत्तर दिलं”. दरम्यान इराणने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा हल्ला केला असल्याने युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

13 जूनपासून सुरू झालेल्या इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेने त्यांच्या तीन प्रमुख अणुकेंद्र फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला आहे. इस्रायली हल्ल्यात इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह अनेक उच्च लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, इराणमध्ये सुमारे एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इराणच्या पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालं आहे.

इराणला अन्य देशांकडून मदत नाही-अमेरिकेने युद्धात इस्त्रायलला मदत केली असून, इराणमधील सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्र फोर्डोसह तीन ठिकाणी बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये अणुऊर्जा केंद्राचे बरेच नुकसान होण्याची भीती आहे. दुसरीकडे, इराणला मध्यपूर्वेतील कोणत्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही आणि त्यांना एकट्याने लढाई लढावी लागली. रशिया आणि चीनसारख्या शक्तिशाली देशांनी इराणला नैतिक पाठिंबा दिला पण अमेरिका-इस्रायलविरुद्धच्या युद्धात उघडपणे पाठीशी उभे राहिले नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता शस्त्रसंधीचा दावा,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ पोस्टवर पोस्ट केलं आहे की, “अभिनंदन! इराण आणि इस्त्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदीसाठी एकमत झालं आहे. सहा तासांच्या आत युद्धबंदी सुरु होईल आणि इराणला आधी त्याचं पालन करावं लागेल. इराणकडून युद्धबंदीचं पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्त्रालयलही युद्धबंदीत सहभागी होईल. 24 तासांनंतर औपचारिकपणे युद्ध संपलं असं मानलं जाईल”.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलच्या सहनशक्ती, धाडस आणि बुद्धिमत्तेचं कौतुक केले आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध वर्षानुवर्षे सुरु राहू शकलं असतं, ज्यामुळे मध्य पूर्व नष्ट होऊ शकले असते. पण असे झाले नाही आणि कधीही होणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, देवाने इराण, इस्रायल आणि मध्य पूर्वे, अमेरिकेसह संपूर्ण जगावर आपली कृपा ठेवावी अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांना नष्ट केलं. एकही अमेरिकन नागरिक मृत्युमुखी न पडणं आणि आपण एका दीर्घ युद्धातून वाचलो, हा माझ्यासाठी एक मोठा विजय आहे. माझे वडील कधीही अमेरिकेला एका दीर्घ युद्धात ओढू इच्छित नव्हते. जे त्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे की त्यांना नेहमीच शांतता हवी असते. त्यांचे अंतिम ध्येय शांतता होती. अमेरिका फर्स्ट.

संबंधित पोस्ट

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर  काय म्हणाला, मीही मेलो असतो तर..; भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया..

युगांडामधील इबोला रोगाचा ताजा उद्रेक आता जागतिक स्तरावर होत आहे  336 संशयित रुग्ण अन् 88 मृत्यू, इबोला उद्रेक; कोविडसारखी परिस्थिती ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढावे- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान