vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पनवेल महानगरपालिका आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम

पनवेल महानगरपालिका आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम

पनवेल प्रतिनिधी -पनवेल महानगरपालिका उद्यान विभाग आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २ जुलै रोजी आयटीआय महाविद्यालय ते तक्का ब्रीज परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.”स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, हरित पनवेल” या संकल्पनेखाली पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुक्त मंगेश चितळे साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उद्यान केंद्रांवरून नागरिकांना मोफत देशी वृक्षांचे रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येत आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत आयटीआय महाविद्यालय ते तक्का ब्रीज परिसरादरम्यान पनवेल महानगरपालिकेतील उद्यान विभाग आणि इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी इनरव्हिल क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा शुभांगी पिंपळकर तसेच सदस्या अम्रिता नाईक, अवंतिका मुरुळकर, सुनिता जोशी, सुलभा निंबाळकर, संजीवनी मालवणकर, शुभांगी पत्की यांच्या मार्फत कदंब, चिंच, कांचन, अर्जुन अशा विविध प्रकारच्या ३० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

 उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने व विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्यान विभागातील उद्यान पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे तसेच सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक किरण गायकवाड व गजलक्ष्मी आंबे यांच्या यांचे सहकार्य लाभले.

वृक्षारोपण मोहिमेत वितरीत करण्यात येत असलेल्या वृक्षांची नावे

बहावा, ताम्हण, कांचन (गुलाबी), कांचन (सफेद),समुद्रफळ,फणस, रबर, सोनचाफा, पारिजातक, बकुळ, तुती, कदंब, करंज,अर्जुन, शमी, काजु, सीता अशोक, जांभूळ, बेल, चाफा (लाल),शार्दूल ,कोनोकारपस

पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपवर देखील नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी विशेष टॅबची सोय करण्यात आली आहे.नागरिकांना या ॲपच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यासाठी झाडांची मागणी करता येणार आहे. या ॲपवर मागणी आल्यास पालिका नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे

संबंधित पोस्ट

गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक ॲप’ वर!

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही· केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांनी राज्यांकडून घेतला स्वच्छताविषयक उपक्रमांचा आढावा…

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta