vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी- कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी,तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, हायस्कूल, शाळा, काहींना नातेंवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.  यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात 13 कुटुंबातील 45 नागरिकांना, हेळवाक येथील 5 कुटुंबातील 17 नागरिकांना,

नावडी, औंध वस्ती येथील 7 कुटुंबातील 15 नागरिकांना, कराड तालुक्यातील कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मीणीनगर येथील 6 कुटुंबातील 24 नागरिकांना, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील 8 कुटुंबातील 18 नागरिकांना, वाई शहरातील 40 कुटुंबातील 135 नागरिकांना, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील 30 कुटुंबातील 65 नागरिकांना,मोरेवाडी येथील 20 कुटुंबातील 42 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

रस्त्यावर पाणी आल्याने तात्पुरते बंद करण्यात आलेल्या 20 ऑगस्ट रोजी रस्त्यांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहेत. पाटण तालुक्यात नेरळे पूल व मुळगाव पूल, पाबळनपाला रस्ता खचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कराड- हेळवाक रस्त्यावर पाणी आल्याने बंद., महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे-मजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला आहे. वाई तालुक्यातील कृष्णा नदीवरील हमदाबाज-किडगाव पूल, करंज-म्हसवे पूल, मौजे जिहे येथील जिहे-कठापूर रोडवरील पुलावरुन पाणी वाहत असलेने रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद (वाठार)-वीर रस्ता व नीरा नदीवरील जून पाडेगाव येथील रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद रस्त्यांमुळे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाभव्य आणि मजबूत असावा- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक-प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

vishwatmaklokswamivarta