vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर

बुलडाणा, प्रतिनिधी : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरखेड, वरवंड व सैलानी या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

            सैलानी गावाला 150 पशुधन व 1008 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 24 हजार 660 लिटर्स पाणी, पिंपरखेड गावाला 800 पशुधन व 680 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 13 हजार 600 लिटर्स पाणी व वरवंड गावाला 950 पशुधन व 3975 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 40 हजार लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर*श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार”*

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री 

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे; महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांचे आभार बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६

vishwatmaklokswamivarta