vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी नाही

ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी नाही

ठाणे प्रतिनिधी: ठाणे महानगरपालिकेस मे. स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होत असून संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता, जलसंपदा विभाग, पाटबंधारे कळवा, ठाणे यांनी निर्देश दिले आहे. त्यानुसार बुधवार दि. 01/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते गुरूवार दि. 02/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत असा 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा असे स्टेम प्राधिकरणाने कळविले आहे. त्यानुसार बुधवार दि. 01/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते गुरूवार दि. 02/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तथापि, ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

         त्या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, रेतीबंदर, व मुंब्र्याचा काही भाग आदी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवार सकाळी 09.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर (म्हाडा) इत्यादी भागात बुधवार रोजी रात्री 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहील, अशा रितीने टप्याटप्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

  वरील शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101

संबंधित पोस्ट

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार केलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड