vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

सातारा प्रतिनिधी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

खरीप पिके – भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण ११ पिके) यांचा समावेश आहे. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु ३०० राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु १५० राहील स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क राहल. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पाहिला मजला, एस.टी. स्टॅन्ड पाठीमागे, सातारा येथे संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

vishwatmaklokswamivarta

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta