vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ;जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ;जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

बुलढाणा, आरोग्य प्रतिनिधी): पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी अंतर्गत उपकेंद्र कोलवड येथे उत्साहात झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ, डीईएमओ राजेश धुताडमल, समुदाय आरोग्य अधिकारी, गावाच्या सरपंच सौ. मीराताई पवार, उपसरपंच चंद्रभागाताई पाटील, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच लाभार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही पालकांची जबाबदारी असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. उपस्थित मान्यवरांनीही पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन केले

00000

संबंधित पोस्ट

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कार्यक्रम आरोग्य शिबिरात २५० डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

लेख-हिवताप दूरीकरण हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक