vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कन्नड येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी घेतला मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कामाचा आढावा१०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार

कन्नड येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी घेतला मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कामाचा आढावा१०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज कन्नड तालुक्यातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनःरीक्षण (एस आय आर) कामाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच एस आय आर चे शंभर टक्के कार्य पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ)यांचा सत्काराही त्यांनी केला.उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार श्रीमती सारिका भगत तसेच इतर तालुका स्तरीय अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

एस आय आर चे १०० टक्के काम पूर्ण करणारे मतदान केंद्र क्रमांक 184,325,279 येथील बी एल ओ यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी गौडा यांनी कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन एस आय आर कामाचा आढावा घेतला. तसेच वृक्षारोपण केले सोबतच येथे असणाऱ्या घनदाट वन येथे ही भेट दिली,

मुंडवाडी येथे असणाऱ्या आदर्श शेतकरी तेजराव बारगळ संचलित अंकुर रोपवाटिकेसही त्यांनी भेट दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

औराळा भागातही जिल्हाधिकारी गौडा यांनी बी एल ओ यांची भेट घेऊन एस आय आर कामाची गती वाढवावी यासाठी मार्गदर्शन केले.

00000

संबंधित पोस्ट

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

देशातील  मोठे व्यवसायिक अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप…