vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सैनिकांचे गुणवंत पाल्य आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी  ‘विशेष गौरव पुरस्कार’ जाहीर; १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिकांचे गुणवंत पाल्य आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी

 ‘विशेष गौरव पुरस्कार’ जाहीर; १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

ठाणे, प्रतिनिधी ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’ योजना जाहीर करण्यात आली आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत विविध क्षेत्रांत उत्कृष्ट व लक्षणीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांना, त्यांच्या पत्नींना आणि पाल्यांना या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

या योजनेअंतर्गत शैक्षणिक, क्रीडा, कला, आपत्कालीन मदत कार्य तसेच देश किंवा राज्याची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या उल्लेखनीय कार्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.पुरस्कारासाठीचे पात्रता निकष: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त किंवा इयत्ता १२ वी परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणात संबंधित विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. IIT, IIM, AIIMS सारख्या नामांकित व ख्यातीप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले विद्यार्थी.

विविध क्षेत्रांतील प्राविण्य व कामगिरी: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीपातळीवर क्रीडा क्षेत्रात पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्य, संगीत, गायन, नृत्य इत्यादी कला क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणारे कलाकार. पूर, जळीत, दरोडा, अपघात किंवा इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती प्रसंगी बहुमोल कामगिरी करणारे. देश किंवा राज्याची प्रतिष्ठा वाढविणारे लक्षणीय कार्य करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी किंवा पाल्य.

अर्जाबाबत महत्त्वाची माहिती: इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.mahasainik.maharashtrag.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करावा. अर्जाची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२६, अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे/पालघर. अधिक संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२२-४५६४१५९३ / ९९२००१६५८०

तरी वरील निकषांनुसार पात्र असणाऱ्या सर्व माजी सैनिकांनी, माजी सैनिक विधवांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निश्चित मुदतीपूर्वी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे/पालघर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

 

संबंधित पोस्ट

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग ४० किमी रस्ता दोन दिवसांत दुरुस्तीचे नियोजन; MIDC पट्ट्यातील १४ किमी रस्त्याची चार दिवसांत दुरुस्ती

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

vishwatmaklokswamivarta

मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

vishwatmaklokswamivarta