vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावीकामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी पाऊल

जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावीकामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी पाऊल

 

अमरावती, प्रतिनिधी जिल्ह्यातील ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी तसेच सीबॉक्स पोर्टलवर त्याची नोंदणी करण्यात यावी असे आवाहन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. ज्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी अशी समिती स्थापन केली नाही व पोर्टलवर नोंद केली नाही त्यांनी तातडीने हे कार्य पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महिला व बाल विकास आयुक्तालयाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध ,मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याच्या कलम -४ अन्वये ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी सीबॉक्स पोर्टलवर (https://shebox.wcd.gov.in ) करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी अशा समिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय,निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे व त्याची नोंद सीबॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक असून सीबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनांनी अद्यापपर्यंत ही कार्यवाही केली नाही त्यांनी ही कार्यवाही पूर्ण करावी तसेच संबंधीत आस्थापनेवरील पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in ही लिंक कार्यालयाच्या दर्शनी भागात तसेच कार्यालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी, व्याख्यान, रॅली उत्साहात साजरी*

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर