vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए जालना शाखा यांच्या वतीने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलMMC BHMS CCMP डॉक्टरांचाCCMP फोर्स व नोंदणी बाबत आज आर डी सी हदगल यांना निवेदन   

 इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए जालना शाखा यांच्या वतीने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलMMC BHMS CCMP डॉक्टरांचाCCMP फोर्स व नोंदणी बाबत आज आर डी सी हदगल यांना निवेदन

राज्य प्रतिनिधी-

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), जालना शाखा,महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये BHMS CCMP डॉक्टरांच्या CCMP कोर्स व नोंदणीबाबत.GR MED 14021(11)/8/2026 MVIP (Adhi) (1736409) दिनांक ३ ऑगस्ट २०२६ नुसार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ५ ऑगस्ट २०२६ पासून CCMP कोर्ससाठी नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही अत्यंत चिंतेत आहोत. या संदर्भात आमचे पुढील म्हणणे आहे:

CCMP कोर्सला तत्कालीन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) किंवा विद्यमान नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) यांची मान्यता नाही. अशा प्रकारचा कोर्स वैद्यकीय शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कोर्स तात्काळ रद्द करण्यात यावा.

देशात कुठेही अशा प्रकारची मेडिकल कौन्सिल नोंदणी पूर्वी झालेली नाही. यासंदर्भात कोणतेही स्पष्ट नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या पात्रता आणि उपचारक्षमतेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

ही बाब सध्या मुंबई उच्च न्यायालयात (WP 6847/2024) प्रलंबित आहे. MMC मधील दुरुस्तीला आधीच आव्हान देण्यात आले आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत शासनाने कोणतीही नोंदणी प्रक्रिया सुरू करू नये. हा विषय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असल्याने अत्यंत संवेदनशील आहे.

२०१४ मध्ये MCI कायद्यात बदल करण्यात आला तेव्हा ग्रामीण भागात पात्र MBBS डॉक्टर उपलब्ध व्हावेत हा उद्देश होता. परंतु MBBS पदवीधरांची संख्या वाढल्यामुळे शासनाने बॉण्ड प्रणाली रद्द केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही MBBS डॉक्टर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.MBBS मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि त्याग अत्यंत महत्त्वाचे आहेत. CCMP डॉक्टरांना MBBS डॉक्टरांच्या बरोबरीचे स्थान दिल्यास MBBS विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.

डॉ बळीराम बागल अध्यक्ष डॉ राजीव डोईफोडे उपाध्यक्ष डॉ प्रल्हाद धारूरकर सचिव डॉ प्रितेश भक्कड कोषाध्यक्ष डॉ प्रकाश सिगेदार डॉ राजीव जेथलीया, डॉ अर्चना काबरा डॉ अमित काबरा डॉ रुषीकेश दीक्षित डॉ किशन खिल्लारी डॉ आनंद अग्रवाल डॉ तुषार शिंदे डॉ अमोल वाघ

 

 

संबंधित पोस्ट

विशेष लेख -“WAVES 2025”माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा..ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा