vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

 

रायगड-अलिबाग प्रतिनिधी- कृषी विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दि.25 ऑगस्ट पूर्वी सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षत्रिय भेटी तसे संस्थांना भेटी आधी द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित केले जातात.

शेतकरी निवडीची कार्यपध्दती: 1 महिला शेतकरी, राज्य तथा केंद्रियस्तरावरील विविध कृषि पुरस्कार प्राप्त व पीकस्पर्धा विजेते शेतकरी व इतर 3 शेतकरी असे जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावामधून एकुण 5 शेतकरी निवड केले जाणार आहेत.

 पात्रता निकष:- अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे असे त्यांनी स्वयंघोषणापत्रात नमुद करावे. (प्रपत्र-2). शेतकरी कुटुंबामधुन फक्त एकाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने स्वखचनि जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब याव्याख्येमध्ये पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले/मुली), शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे.

शेतकरी शारीरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. अर्ज सादर करतेवेळी पारपत्राची वैध मुदत किमान एक वर्षअसावी. शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगीसंस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियांता, कंत्राटदार इ. नसावा असे त्यांनी स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2). शेतकऱ्याने यापूर्वी शासकिय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2). शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.अनुदानाचा तपशिलः शासनाकडून अभ्यासदौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतक-यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 2.00 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख: 25 ऑगस्ट 2026 अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.

०००००००

संबंधित पोस्ट

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वाचन कट्ट्या’ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी बडनेरा येथे जमीन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची स्ट्राँगरुमला भेट

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग निदानाविरुद्ध जनजागृती करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी