vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कुमारी रुचिता आढळराव धारावीच्या लेकीचा कौन बनेगा करोडपती मध्ये डंका ! धारावीतील सामाजिक संस्थेकडून रुचिताचा गौरव..

 कुमारी रुचिता आढळराव धारावीच्या लेकीचा कौन बनेगा करोडपती मध्ये डंका ! धारावीतील सामाजिक संस्थेकडून रुचिताचा गौरव..

मुंबई प्रतिनिधी- आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या या धारावीत पुन्हा एकदा धारावीकरांचा मान उंचावला आहे धारावी विभागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुमारी रुचिता आढळराव ह्या मुलीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या टीव्ही शो वरील कौन बनेगा करोडपती ह्या लोकप्रिय कार्यक्रमात हॉट सीट पर्यंत पोहोचून ज्ञानाच्या व बुद्धीच्या बळावर कठीण प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन 50 लाख रुपये चे विजेतेपद पटकावला आहे या कार्याची दखल घेऊन धारावी विभागातील सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन भेटवस्तू देऊन कौतुक केले

 

परिस्थितीने माणूस कितीही मागे असला तरी ध्येय चिकाटी व जिद्द या जोरावर यश प्राप्त करू शकतो हे उदाहरण धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुमारी रुचिता आढळराव ह्या मुलीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या टीव्ही शो वरील कौन बनेगा करोडपती ह्या लोकप्रिय कार्यक्रमात हॉट सीट पर्यंत पोहोचून ज्ञानाच्या व बुद्धीच्या बळावर कठीण प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन 50 लाख रुपये जिंकणाऱ्या सर्व स्तरातून कौतुक होत असताना धारावीतील झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन आणि धारावी नागरिक समिती या सामाजिक संस्थेकडून गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी तिच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबासह तिची भेट घेऊन कु रुचिता हिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ लेदर ची भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर अलका साबळे सविता शेरखाने कुंदन तावरे व शंकर खिल्लारे यांनी भेट घेतली त्यावेळी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी मी हा खेळ खेळला व यशस्वी झाले की भावना कुमारी रुचिता यांनी व्यक्त केली आणि धारावीकरांकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल आभार मानले यावेळी तिची आई वडील सोबत होते आठ बाय दहाच्या भाड्याच्या घरात व शौचालय च्या समोर राहत असल्यामुळे दुःख व्यक्त केले या परिस्थितीतही या कन्याने धारावीकरांचे नाव मोठे केले त्याबद्दल त्यांच्या कुटुंबासह कुमारी रुचिता हिचे श्री दिलीप गाडेकर यांनी आभार मानले व पुढील कार्यास हार्दिक व सदिच्छा दिल्या.

कुमारी रुचिता आढळराव धारावीच्या लेकीचा कौन बनेगा करोडपती मध्ये विजेतेपदी मिळवल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे विश्वात्मक लोकस्वामी वार्ता डिजिटल न्यूज परिवार यांनीही त्यांचे भरपूर कौतुक  भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जून – २०२५ चा मासिक व साप्ताहिकभव्य सोडतीचा निकाल जाहीर

आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती,राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना..

हिंदी दिवसानिमित्त दुर्गामाता विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा सुधारण्यावर भर- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta