vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम-आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम-आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

जालना,द प्रतिनिधी: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर अवैध दारू व वाळू वाहतुकीवरही कारवाई करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. 169 वाहनांची तपासणी करून 59 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ओव्हरलोड, विनापरवाना वाहतूक, विना-PUC, रिफ्लेक्टर नसणे, सीटबेल्ट न लावणे तसेच विना-HSRP नंबर प्लेट आदी नियमभंगाचा समावेश आहे. या कारवाईत जागेवर 5 लाख 6 हजार 500 रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रलंबित ई-चलानपोटी 81 हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला. त्यामुळे एकूण 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी छापे टाकून 9 गुन्हे दाखल करत 9 आरोपींना अटक केली. या कारवाईत 46.44 लिटर अवैध देशी दारू, 45 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 36 हजार 200 रुपये आहे.

महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांवर कारवाई केली. भोकरदन तालुक्यातील राजूर नाका येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह पकडण्यात आला.

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 36 जणांवर तर कलम 129 अन्वये 7 जणांवर, तर इतर कायद्यांतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. एकूण 44 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक खटले दाखल करण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाहतूक, दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

****

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

vishwatmaklokswamivarta