vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गणपती शॉपिंगसाठी रविवारी बाहेर पडणार आहात? आधीच बघा 13 सप्टेंबरला मुंबई लोकलचा कुठे आहे मेगा ब्लॉक!

गणपती शॉपिंगसाठी रविवारी बाहेर पडणार आहात? आधीच बघा 13 सप्टेंबरला मुंबई लोकलचा कुठे आहे मेगा ब्लॉक!

मुंबई प्रतिनिधी- रविवार, 13 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेकडून मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, याचा थेट परिणाम ठाणे-कल्याण तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.
ठाणे-कल्याण मार्गावर 5 तासांचा मेगा ब्लॉक,ठाणे आणि कल्याणदरम्यानच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या काळात मुलुंडहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या काही धीम्या आणि अर्धजलद लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलना ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथे थांबे दिले जातील. त्यामुळे संबंधित गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा साधारण 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. कल्याणहून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या काही अप धीम्या आणि अर्धजलद लोकलदेखील या कालावधीत फास्ट मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथे थांबतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.याशिवाय CSMT येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या किंवा तेथे पोहोचणाऱ्या धीम्या लोकलवरही परिणाम होणार असून, त्या सुमारे 10 मिनिटे उशिराने धावू शकतात.
ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द,ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यानच्या अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात ठाणेहून वाशी, नेरुळ आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तसेच या स्थानकांहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा विचार करणे आवश्यक आहे. दरम्यान, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारीच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सेल्फीव्दारे आवाहन

दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील    -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन