vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथे पीएम विश्वकर्मा लाभार्थी मेळावा**पारंपरिक कारागिरांनी उद्योग विस्तारासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ*

*जालना येथे पीएम विश्वकर्मा लाभार्थी मेळावा**पारंपरिक कारागिरांनी उद्योग विस्तारासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ*

 

जालना, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त योगेश सारणीकर, एमएसएमईच्या सहायक संचालिका श्रीमती सुनिता, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा पीएम विश्वकर्मा योजनेचे सदस्य सचिव रुपेश आचारी, ज्येष्ठ पर्यवेक्षक विष्णू कायंदे तसेच मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश आचारी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पीएम विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे, लाभार्थ्यांची पात्रता, योजनेअंतर्गत मिळणारे प्रमाणपत्र, टूलकिट तसेच उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योगवाढीसाठी बँकांमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्ज सुविधांची माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थी उद्योजकांना टूलकिट तसेच कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री. मिसाळ यांनी पारंपरिक कारागिरांच्या उद्योजकीय प्रवासाचे कौतुक केले. कारागिरांनी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच आपल्या उत्पादनाचे प्रभावी ब्रँडिंग करून बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी पीएम विश्वकर्मा उद्योजकांनी आपला सिबिल/क्रेडिट स्कोअर चांगला राखल्यास बँकांकडून कर्जपुरवठा सुलभ होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले.

मेळाव्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या काही लाभार्थी उद्योजकांनी आपली यशोगाथा व मनोगत व्यक्त केले. पारंपरिक कारागिरांसाठी योजना उपयुक्त असून अधिकाधिक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

 

****

संबंधित पोस्ट

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले’जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’चा समारोप

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

vishwatmaklokswamivarta