vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींच्या पूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन-‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी उपक्रम

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींच्या पूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन-‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी उपक्रम

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : ‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी तसेच सन 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड जयंत चाचरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगडमार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समितीस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील आवश्यक कागदपत्रे व अन्य त्रुटींची पूर्तता करून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विद्यार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी तसेच सन 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे अनुसूचित जाती, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी या विशेष शिबिराचा लाभ घेऊ शकतात.दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शिबिराचे ठिकाण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, 1402 अ, प्लॉट नं. 9, स. नं. 76/2 ब, सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग येथे आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा. शिक्षणातील प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता विद्यार्थ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

००००००००

संबंधित पोस्ट

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta