vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री बाबासाहेब पाटील विविध शेतकरी संघटनांसोबत बैठक संपन्न; केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ नेणार

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री बाबासाहेब पाटील-विविध शेतकरी संघटनांसोबत बैठक संपन्न; केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ नेणार

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच साखरेची आधारभूत किंमत आणि ऊस उत्पादकांच्या रास्त व किफायतशीर दरासंदर्भातील (एफआरपी) मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्र शासनाकडे नेण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित, साखरेच्या दरातील सुधारणा, ऊस वजनातील पारदर्शकता आणि साखर कारखान्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, साखर आयुक्त संजय कोलते, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखरेची आधारभूत किंमत आणि ऊस उत्पादकांच्या ‘एफआरपी’संदर्भातील मागण्यांवर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनांनी मांडलेल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.ऊस वजनात पारदर्शकतेसाठी भरारी पथके

गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी साखर आयुक्तांनी वैधमापन विभागाशी समन्वय साधून भरारी पथके स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील तांत्रिक बाबी वैधमापन विभागाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याने शासन स्तरावर संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रिव्हाइज्ड स्टॅच्युटरी फॉर्म्युला सादर न करणाऱ्या तसेच त्यातून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न देणाऱ्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करण्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा आणि कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) सध्याच्या पातळीवरून वाढवून ५५ रुपये प्रतिकिलो करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. साखरेच्या दरात सुधारणा झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यास मदत होईल, अशी भूमिका प्रतिनिधींनी मांडली.

वजनकाटे बसविण्याची प्रक्रिया तसेच वजनकाट्यांची ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्याच्या मागणीवरही चर्चा झाली.

 

0000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान**जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन*

निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण