
सेवा संकल्प अभियानांतर्गत नवीन जालना मंडळात चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना (प्रतिनिधी):: भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपा जालना महानगर च्या नवीन जालना मंडळाच्या वतीने आज (दि.१६) रोजी मुर्गीतलाव येथील मनपा शाळेत चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षण, कला आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, कार्यक्रमाचे आयोजक मंडळ अध्यक्ष सुनील भैया खरे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सिद्धिविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, शिवप्रकाश चितळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने, नगरसेवक अक्षय गोरंटयाल, विजय कामड, नगरसेवक कल्याण भदनेकर, स्नेहलता कामड, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, संतोष खंडेलवाल, विष्णू डोंगरे, राहुल यादव उमेश पेंढारकर, चेतन देसरडा, संदीप नाईकवाडे, आकाश देशमाने, भगवान नागवे आदींची उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अनीस अन्सारी, कुरेशी मॅडम यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच कला, संस्कार आणि सर्जनशीलतेला महत्त्व देणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. अशा गुणांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी आत्मविश्वासाने आपली प्रगती साधू शकतात. सेवा, समर्पण आणि समाजाप्रती उत्तरदायित्व या भावनेतून राबविण्यात येणारे सेवा संकल्प अभियान हे केवळ सेवाभावी उपक्रमांपुरते मर्यादित नसून समाजातील विविध घटकांपर्यंत मदत आणि सकारात्मक विचार पोहोचविण्याचे माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील भैय्या खरे यांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेब कोलते जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, भाजपा9860707500



