vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश; बारवाले महाविद्यालयात युवा संसद.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश; बारवाले महाविद्यालयात युवा संसद.

जालना प्रतिनिधी-: युवा पिढीला व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देणे, व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी युवकांना जागृत करणे या उद्देशाने बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे ‘नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय आसपडोस युवा संसद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या उपक्रमाचा भाग म्हणून माय भारत, जालना आणि बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे, माय भारत, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते

यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण नाफडे, जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे, क्षयरोग विभागाचे आरोग्य निरीक्षक अमोल सांबरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती पुरी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बिस्मिल्ला सय्यद, गजानन काळे आणि वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे आणि समाजाच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हे अशा उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी क्षयरोग विभागाचे आरोग्य निरीक्षक अमोल सांबरे यांनी व्यसनांमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि आरोग्याच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या विविध समस्यांविषयी मार्गदर्शन केले. व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच कुटुंब आणि समाजालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच क्षयरोगामुळे होणारे नुकसान आणि आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बिस्मिल्ला सय्यद यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन या मार्गदर्शनातून करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी पल्लवी धनगर हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत उजेड यांनी केले, तर कांचन कायंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेऊन व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. शपथविधीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामेश्वर म्हस्के, जयपाल राठोड, सुंदर वायाळ, संदीप गुरखा, भीमराव मोरे, दीप्ती जैन, काशिनाथ खलसे यांच्यासह इतरांनी सहकार्य केले.

00000

संबंधित पोस्ट

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा**पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य*

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

vishwatmaklokswamivarta