vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी…

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी…

 

राज्य प्रतिनिधी: दिपावली सणाच्या काळात अन्नपदार्थत होणारी भेसळ रोखण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न प्राप्त होईल यासाठी अन्न औषध प्रशासन मार्फत सक्रियपणे कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक डेअरीची तपासणी करून दुधाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित डेअरींना नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या डेअरी स्वच्छतेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर परवाना निलंबन अथवा रद्द करणे या प्रकारचे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती (अन्न) अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिले आहे.

 

 

 

सणानिमित्त मिठाईसाठी खव्याची मागणी जास्त प्रमाणात असते हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने भेसळयुक्त खवा बाजारात येऊ नये या दृष्टीने अन्न औषध प्रशासन कारवाई करणार आहे त्याचप्रमाणे दही, तूप, पनी,र श्रीखंड, बासुंदी इत्यादी दुग्धजन्य पदार्थात जर भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन-तीन महिन्यामध्ये अन्न औषध प्रशासनामार्फत संबंधित कार्यालयाचे मुख्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार सातारा शहरातील कंदी पेढे उत्पादक पेढ्यांची तपासणी करून अन्न नमुने घेण्यात आले आणि स्वच्छतेचे पालन न करण्यात आलेल्या काहीवर दंडात्मक कारवाई देखील घेण्यात आलेली आहे या प्रकारची कारवाई आणखी घेतली जाणार आहे.

 

दूध, खवा, पनीर, मिठाई इतर तसेच दिवाळीच्या अनुषंगाने वापरात येणारे कच्चे अन्नपदार्थ जसे रवा आटा मैदा इ. सर्व अन्नपदार्थ बाबत भेसळीची माहिती प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासन यांना द्यावी, असे आवाहनही श्रीमती भोईटे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची ठाकरे गट आणि शिंदे गट सर्वोच्च न्यायालयतील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला…

vishwatmaklokswamivarta

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विद्यापीठांकडे

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

कृषी विज्ञान या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित उपक्रम;बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

vishwatmaklokswamivarta