vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

निर्यातीत बुलढाणा जिल्हा विभागात अव्वल*जिल्ह्यातून ४६५.१८ कोटींची निर्यात…

निर्यातीत बुलढाणा जिल्हा विभागात अव्वल*जिल्ह्यातून ४६५.१८ कोटींची निर्यात…

 

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,  : महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी एक लाख कोटी डॅालर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. यादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. या काळात बुलढाणा जिल्ह्यातून ४६५.१८ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातून २७९.४९ कोटी, यवतमाळ १५०.६६ कोटी, अकोला १४५.८३ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातून ३१.५२ कोटी अशी एकूण १०७२.६७ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात अमरावती विभागातून झाली आहे.

*जिल्ह्यातून निर्यात होणारी उत्पादने*

जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने, रासायनिक उत्पादने, साबण, अभियांत्रिकी उत्पादने, तृणधान्य, दागिने, सोयाबीन संबंधित उत्पादने, बियाणे, भाज्या आणि कापूस गाठींची निर्यात होते.

*या देशांत होते निर्यात*अमेरिका,श्रीलंका, यूएई, सौदी अरब, ब्राझील,कोरीया, चीन, सिंगापूर, तुर्की, थायलंड, बांगलादेश,पाकिस्तान, व्हिएतनाम, नेदरलँड, झिम्बाब्वे, मलेशिया आदी देश जिल्ह्यातील उत्पादनाचे आयातदार आहेत. या देशांमध्ये जिल्ह्यातून विविध उत्पादनांची निर्यात केली जाते.

बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासह, कृषी, अन्न प्रक्रिया, बांबू प्रक्रिया, रसायन, गृहोपयोगी वस्तू, अभियांत्रिकी उत्पादने, सेंद्रिय रसायने, कापड उत्पादने यासह अन्य क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. उद्योजकांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती सोबत जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.००००

संबंधित पोस्ट

रोजगार हमी योजनेतून २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती-जिल्हाधिकारी संजय दैने मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण १०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 महत्वाची भूमिका बजावेल— कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व वाहतूक करण्यास,अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी.

vishwatmaklokswamivarta

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गतविभागस्तरीय तपासणी समितीकडून जिल्ह्यातील सिंधी पिंपळगाव व वालसा खालसा गावाची पाहणी

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे