vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण ,क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण ,क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना यावर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव दि. १० जानेवारी २०२५ पर्यंत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

या कार्यालयात यापुर्वी विहीत मुदतीत ज्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत, त्यांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, दिव्यांग गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम १० हजार रुपये असे आहे. त्या अनुषंगाने सन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 पुरस्काराचे निकष : पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे, क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३० र्वो पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व ५ वर्षापैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना १ जुलै ते ३० जुन असे राहील. उपरोक्त तिनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा पुन्हा (अनेकवेळा) सादर करु नयेत. अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असलयाबाबतचे संबंधित तहसिलदार यांचेकडून अॅफीडेविट करुन घ्यावे. विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेवुन सदरचे परिपुर्ण सिल बंद लिफाफ्यामध्ये परिपुर्ण अर्ज दि.१० जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा या कार्यालयास सादर करावेत. विहीत मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे.०००

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !हिंदु राष्ट्ररत्न : अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन;  सनातन धर्मश्री : मंत्री कपिल मिश्रा, चित्रपट निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गौरीशंकर मोहता, शिल्पकार प्रमोद कांबळे

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta