vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीचेदि.17 जानेवारी रोजी आयोजन,वर्ग 1 व 2 च्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीचेदि.17 जानेवारी रोजी आयोजन,वर्ग 1 व 2 च्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 

ठाणे, प्रतिनिधी:- दि.07 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्ताने पूर्वनियोजन व इतर विषयांकरिता शुक्रवार, दि.17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीकरिता महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि. कुलथे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्यासमवेत महासंघाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत महासंघाच्या कल्याण केंद्रासाठीच्या निधी संकलनाच्या कामाचा आढावा, महासंघाचे कार्यसंस्कृती अभियान, जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन करणे, पगारात भागवा अभियानाची अधिक उत्स्फूर्तपणे अंमलबजावणी तसेच अध्यक्षांच्या मान्यतेने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा होणार आहे.

तरी सर्व पदाधिकारी, ठाणे जिल्हा समन्वय समिती व सर्व शासकीय विभागातील वर्ग 1 व 2 च्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी शुक्रवार, दि.17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, कोकण विभागाचे सहसचिव डॉ.अविनाश भागवत तसेच सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta