vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 

मुंबई, प्रतिनिधी : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथ, ग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळे, उमेश भगत, उपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवी, कार्यकारी अभियंता दिनेश पाटील, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोर, सहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

000000

संबंधित पोस्ट

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आज १४२ व्या जयंती निमित्ताने जालना शहर महापालिका तर्फे विनम्र अभिवादन.

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!