vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

 

बुलडाणा, प्रतिनिधी: देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाचे असून शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांचेही कार्य महत्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले

बेंगळुरू येथील श्री श्री रविशंकर विद्या मानववीर ट्रस्टने आयोजित केलेल्या “श्री श्री एज्युकेशन अवॉर्ड्स 2025” चे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी उपस्थित होते.

मंत्री श्री. जाधव म्हणाले की पुरस्कार हे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले. देश का प्रकृती अभियान देशात 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 पर्यंत चांगल्यारितीने राबविल्या गेले. या अभियानात तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तींना त्यांच्या प्रकृती संदर्भाची माहिती देण्याचं काम देशभर केल्या जात आहे. श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारने संपूर्ण देशभर लोकांमध्ये जनजागृती व सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था जागतिक दर्जाची आहे. तणावमुक्त आणि मूल्यावर आधारित शिक्षण देत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आधार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकासावर भर दिला पाहिजे, अस मत ही त्यांनी व्यक्त केले आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.

0000000

संबंधित पोस्ट

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’अभियानाचे ऐतिहासिक पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स-केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण 1 लाख 81 हजार स्वयंसेवकांचे योगदान..

vishwatmaklokswamivarta

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

vishwatmaklokswamivarta