vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील बेटांवर ध्वजारोहणाचा ऐतिहासिक उपक्रमजिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण..

महाराष्ट्रातील बेटांवर ध्वजारोहणाचा ऐतिहासिक उपक्रमजिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण..

 

अलिबाग ( प्रतिनिधी  : राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदा पहिल्यांदाच एक ऐतिहासिक उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील ६२ बेटांवर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवणे, भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागवणे आहे.

या अनोख्या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक प्रशासन,तटरक्षक दलातील अधिकारी,माजी सैनिक, ग्रामस्थांचा सहभाग लाभला.हा उपक्रम देशातील ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आणि देशवासीयांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. यामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यास मदत होईल आणि भारतीय समुद्री परंपरेची जाणीव होईल.

0000

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवर प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे एक पेन एक वही महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta