vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्ह्याचा सन २०२५-२६ साठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या आराखड्याचे विमोचन केले. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर हे यावेळी उपस्थित होते.

या संदर्भत नाबार्डचे व्यवस्थापक सुरेश पटवेकर यांनी माहिती दिली की, कृषी पत, कृषी पायाभूत सुविधा आणि पूरक क्षेत्रविकास अशा तीन क्षेत्रांचे वर्गीकरण करुन पतआराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषी पत यात ४ हजार २६७ कोटी रुपये, त्यात प्राधान्याने शेतमाल उत्पादन, देखभाल व विपणन, कृषी कर्ज व संलग्न उपक्रमांचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपयांची तरतूद असून इतर पूरक क्षेत्रविकास क्षेत्रासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस्ठी ८०१० कोटी रुपये, निर्यात कर्ज पुरवठ्यासाठी ३६ कोटी रुपये, शिक्षणासाठी ९९ कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुविधा ७८ कोटी रुपये, उर्जा नविनीकरणासाठी ६० कोटी रुपये, इतर ४३३ कोटी रुपये असा एकूण १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षी पत आराखडा १२ हजार ७६५ कोटी रुपयांचा होता, अशी माहिती सुरेश पटवेकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली 

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच