vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

——

अंबड प्रतिनिधी: तालुक्यातील शहागड येथील बस स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशासंह स्थानिक नागरिकांची कुचुंबना होत होती. हा प्रश्न सोडविण्याचा शब्द समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला होता. त्यानुसार या ठिकाणी १० लक्ष रुपयांचा निधी मिळवून देत सुसज्ज अशा स्वच्छतागृहाची निर्मिती त्यांनी केली. प्रवाशांसह येथील व्यापाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शहागडच्या जनतेने सतीश घाटगे यांचे आभार मानले.

गेल्या अनेक वर्षापासून शहागड बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा प्रश्न चर्चेत होता. परंतु कुणीही हा प्रश्न मार्गी लावू शकले नव्हते. सहा महिन्यापूर्वी शहागड येथील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सतीश घाटगे पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. सतीश घाटगे यांनी हा प्रश्न संवेदनशील पणे समजून घेऊन शहागड बस स्थानक परिसरात सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी 10 लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. या निधीतून बस स्थानक परिसरात सुसज्ज असे स्वच्छतागृह तयार झाले. 2 फेब्रुवारी रोजी सतीश घाटगे यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाची लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह खुले करण्यात आले.

सत्ता असो वा नसो जनतेचे प्रश्न सोडवता येते- सतीश घाटग,

 जनतेचे प्रश्न खूप मोठे नाहीत, फक्त ते सोडविण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. निवडणुकीत पराभव झाला असला तरी माझे राजकारण विकासावर होते आणि यापुढेही राहील. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता असो किंवा नसो प्रश्न सोडवता येतात. माता – भगिनींची स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबना थांबवता आली याचे समाधान आहे. हे काम करून मी शहागडच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

संबंधित पोस्ट

स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश 

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार

अमरावती विभागात 200 तरुणांना ‘टूरिस्ट गाइड’ बनण्याची संधी;पर्यटन संचालनालयातर्फे 7 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये भारतीय उद्योग महासंघासह भागीदारीमध्ये 20,000 चौरस फूट क्षेत्रावर कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार; पुढील आठवड्यात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा: सचिव,उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग