vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

गडचिरोली, प्रतिनिधी:जिल्ह्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या सात तालुक्यातील ७ लाख २२ हजार ४२३ पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या देण्यात येणार आहेत. हत्तीरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी औषधोपचार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी केले आहे.हत्तीरोग संसर्ग रोखण्यासाठी डी.ई.सी., अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टीन या तीन औषधांची मात्रा उंचीनुसार आणि वयोगटानुसार दिली जाणार आहे. २ वर्षांखालील बालके, गर्भवती महिला आणि गंभीर आजारग्रस्त रुग्ण वगळता सर्व नागरिकांनी हत्तीरोगविरोधी गोळ्या सेवन कराव्यात. हत्तीरोगविरोधी गोळ्या सुरक्षीत असून त्या सेवन करणे हा हत्तीरोगापासूच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे डॉ. हेमके यांनी सांगितले.१० ते २० फेब्रुवारी दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन पात्र नागरिकांना या गोळ्या देतील. तसेच २१ व २२ फेब्रुवारी रोजी आरोग्य संस्था, बस स्थानके, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ७२५ विशेष बूथ उभारून औषधोपचार केले जातील. मोहिमेदरम्यान वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी २४, २५, २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मॉप-अप फेरी घेण्यात येणार आहे.या मोहिमेसाठी ३१०९ आरोग्य कर्मचारी आणि ३१३ पर्यवेक्षक कार्यरत असणार असून १५६५ पथकांद्वारे घरगुती भेटी दिल्या जातील.

संबंधित पोस्ट

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारातील संभाव्य अनियमिततेबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र