vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु

गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु

, राज्य प्रतिनिधी गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील दिनांक 06फेब्रुवारी 2025 रोजी शेतशिवारामध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी (चातगांव) व आरआरटी टिम यांना वाघ जखमी अवस्थेत आढळला.सदर घटनेची तात्क्ळ वरीष्ठ कार्यालयास सुचना देण्यांत आली. व वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार रात्रभर वाघावार निगरानी ठेवण्यांत आली. एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास उपचाराकरीता दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेरबंद करण्यांत आले व उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यांत आले. वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर अहवाल समोर येईल. सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व त्यांचे कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक गडचिरोली शैलेश मिना व अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) चातगांव व आरआरटी टिम, नवेगांव नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत कार्यवाही पार पडली, असे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी कळविले आहे.000

संबंधित पोस्ट

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन