vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

           जालना, प्रतिनिधी- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

    संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनप्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!*व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय वारशाचा अवमान खपवून घेणार नाही* – हिंदु जनजागृती समिती

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta