vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

 

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षी पासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 

मंत्रालयातील त्यांच्या दालनात त्यांनी लोणार सरोवर बाबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील दूरदृष्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

 

जगात उल्कापातामुळे झालेले तीन सरोवर आहेत. त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षी पासून पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन त्याची तारीख व वेळ घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 00000

संबंधित पोस्ट

मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा व नारीशक्तीचा जागर – महापौर श्रीम.सुजाता पाटील

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

vishwatmaklokswamivarta

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

गणपती बाप्पा मोरया’ मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

vishwatmaklokswamivarta

१५० दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी स्विकारला सत्कार

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय आढावा बैठक..