vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा,वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा,वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार विभागाचे अधिकारी, विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगर, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

 

000

संबंधित पोस्ट

शहरातील नागरिकांनाही घरकूल ! प्रधानमंत्री आवास योजना २.०; ऑनलाईन नोंदणीची सुविधा..

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती