vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्येपायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्येपायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव दि.२२ फेब्ब्रुवारी पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पायाभुत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा आता २ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात यापूर्वी प्राप्त झालेले प्रस्ताव दि.१३ फेब्रुवारी २०२५ च्या परिपत्रकानुसार रद्द करण्यात आले आहेत. तरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अटी व शर्ती नुसार पात्र शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दि.२२ पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्‍त प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर,विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

ग्रीनलँड-इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन