vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

 

जालना, प्रतिनिधी :- शासनाकडून कौटुंबिक हिसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी अधिनियम 2005 कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपण संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्ज करू शकता.

 या कायद्यात तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरूध्द होणारे कौटूंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता. प्रतिवादी कडून तुमचे स्त्रिधन, दाग दागीने, कपडे, कागदपत्रे इत्यादी हस्तगत करू शकता. तुम्ही ज्या सहभागी घरात राहत होता त्या घरात राहण्याचा आपला हक्क आहे. तुमचे सहभागी घर हस्तांतरीत करण्यास किंवा विकण्यास पायबंद घालु शकता. प्रतिवादीकडून आपल्याला आणि आपल्या मुलांना उपजिवीकेसाठी अर्थ सहाय्य मिळवू शकता. मोफत कायदे विषयक सल्ला केंद्र, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकिय सुविधा, निवारगृह, आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करून घेवु शकता.

सदर कायद्यान्वये खालील प्रमाणे आदेश मिळवू शकता,कलम 17- सहभागीत घरामध्ये राहण्याचा हक्क मागु शकता. कलम 18- कोणत्या प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी संरक्षण आदेश. कलम 19- निवासासाठीचा आदेश मिळवू शकता. कलम 20- उपजिवीकेसाठी अर्थसहाय्याचा आदेश मिळवू शकता. कलम 21- यामध्ये आपली अज्ञानपालक मुलांचा ताबा मिळवू शकता. कलम 22- हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मागू शकता. अधिक संपर्कासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला जालना येथे किंवा एस. जी. कुलकर्णी 9011778743 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आ

संबंधित पोस्ट

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्सेस’ने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्याचे निर्देश

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश* 

vishwatmaklokswamivarta

राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ प्रदूषणमुक्त वने आणि पर्यावरण यासाठी उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश