vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

*उंडाळे व काशीळ येथे0आरोग्य शिबिराचे आयोजन* 

*उंडाळे व काशीळ येथे0आरोग्य शिबिराचे आयोजन*

 

सातारा प्रतिनिधी- जि.मा. का सातारा जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जिल्हा रूग्णालय सातारा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा, ग्रामीण रुग्णालय काशीळ व उंडाले व तालुका आरोग्य अधिकारी सातारा, कराड व पाटण यांचे संयुक्त्त विद्यमाने संपूर्ण सुरक्षा केंद्र व एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत नागरिकाना एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कराड तालुकातंर्गत ग्रामीण रुग्णालय उंडाळे या ठिकाणी दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी व सातारा तालुकातंर्गत ग्रामीण रूग्णालय काशीळ या ठिकाणी दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर व स्टाफ कडून नेत्र तपासणी, दंतरोग व मौखीक आरोग्य तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग व कुष्ठरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, कान- नाक-घसा तपासणी, मानसिक आरोग्य व आजार तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, एक्स रे, क्षयरोग तपासणी, शल्यचिकित्सा तपासणी, लैगिंक आजार विषयक तपासणी, कर्करोग तपासणी सह रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीन, थायरॉइड, कावीळ, सिफिलीस, यकृत व किडणी कार्य चाचणी, एच. आय. व्ही चाचणी सह महालॅब मार्फत इतर सर्व प्रकारच्या महत्वाच्या तपासण्या गरजेनुसार करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंर्गत पुढील उपचारांकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी काशीळ व उंडाळे परिसरातील सर्व नागरिकानी या सर्वरोग निदान शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यानी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी

पिंपळगाव देवी येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

vishwatmaklokswamivarta

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

vishwatmaklokswamivarta