vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

 

 सातारा प्रतिनिधी: जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक पाऊल उचलत दिनाक २२ सप्टेंबर २०२५ पासून विनामूल्य किमोथेरपी सेवा (डे केअर किमोथेरपी सेंटर) सुरू करण्यात आली आहे. ही सेवा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या नेतृत्वाखाली व प्रभावी नियोजनातून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या किमोथेरपी युनिटमुळे आता कर्करोग रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये होणारा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे

ही सेवा दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप वाठारे (ओरल कॅन्सर सर्जन) हे रुग्णालयात उपस्थित राहून मुख कर्करोग संशयित तसेच निदान निश्चित झालेल्या रुग्णाची तपासणी करून पुढील उपचार, संदर्भसेवा व मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे विशेषता मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग रुग्णाना त्वरित व शास्त्रशुद्ध उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे.

तरी नागरिकांना कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास अथवा निदान निश्चित झाल्यास विलंब न करता स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथील एनसीडी विभाग (ओपीडी क्रमांक १७) येथे संपर्क साधून मोफत कर्करोग तपासणी व किमोथेरपी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी…

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ११वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

15 जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत…

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी