vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

बुलडाणा, प्रतिनिधी : पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 10 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.

देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत शुक्रवार, दि. 7 मार्च 2025 पर्यंत पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-  रोहयो मंत्री भरत गोगावले

विभागीय कला व क्रीडा महोत्सव 2025 थाटात संपन्न

vishwatmaklokswamivarta

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील