vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

 

मुंबई, प्रतिनिधी:- परभणी येथील घटनेत अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाच्या अंतिम निष्कर्षानंतर यासाठी दोषी असलेल्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या निवेदनानुसार त्यांच्या मुलाला नोकरी देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सदस्य भाई जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी, डॉ.प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

गृहराज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, परभणी येथे प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 43 जणांना अटक करण्यात आली. या घटनेत अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे 16 डिसेंबर 2024 रोजी शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात हिस्टोपॅथॉलॉजी परीक्षण अहवालानंतर मृत्यूचे अंतिम कारण निश्चित करुन अंतिम अहवाल देणार असल्याचे नमूद करण्यात आले असून हा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ.भोयर यांनी सांगितले.

या प्रकरणाची सीआयडी मार्फत तसेच न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीमार्फत सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी दिली.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

विशेष लेख :-सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta