vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

ठाणे, प्रतिनिधी:- मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

या मेट्रो उडाणपूल क्र.2 चे प्रमुख वैशिष्टे हे स्थळ एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरु होऊन शिवार गार्डनपर्यंत सुमारे 850 मीटर लांबीचा आहे. या मेट्रो उड्डाणपूलास 21 खांब आहेत. तर पोहोच अप रस्त्याची लांबी 122.6 मिटर तर पोहोच रस्त्याची डाऊन लांबी 15.3 मिटर आहे. उडाणपुलाच्या वाहतूक मार्गाची रुंदी 17 मीटर एवढी आहे. ज्यामध्ये दोन लेन आहेत. यामध्ये सायनेजेस, स्पीड ब्रेकर आणि कॅट आइज तरतूद करण्यात आली. सुरक्षिततेकरिता आरसीसीचे क्रॅश प्रतिबंधक बनविण्यात आले. सुरळीत नेव्हीगेशन परावर्तित चिन्हे, लेन खुणा आणि वेग मर्यादा निर्देशक बसविण्यात आले आहेत. पाणी साचणे टाळण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. डाऊन स्ट्रीम रॅम्पवर वाहनाचा वेग नियत्रिंत करण्यासाठी रंबल स्ट्रिप्स आणि स्पीड बसविण्यात आले आहेत.एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरु होऊन शिवार गार्डन जंक्शन पर्यंत तीन जंक्शनची कोंडी कमी करणे हा या मार्गाचा उद्देश आहे. उडाणपूलामुळे सिग्नलवर होणारी वाहतूकीची गर्दी कमी होईल. तर वाढत्या वाहतूकीच्या मागण्यांना संबोधित करुन एक महत्वपूर्ण पायाभूत सुविधा अपग्रेड म्हणून काम होईल.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’च्या माध्यमातून लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप.