vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर..

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी : साहित्य अकादमीने 2024 साठीच्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा असून, मराठी भाषेसाठी हा सन्मान सुदर्शन आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी गुरचरण दास लिखित इंग्रजीतील ‘द डिफिकल्ट ऑफ बींग गुड’ ( ‘The Difficulty of Being Good’ ) या साहित्यिक समीक्षेचा उत्कृष्ट मराठी अनुवाद केला आहे.

साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक रवींद्र भवन, येथे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 2024 साठीच्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारांसाठी 21 भाषांतील पुस्तकांची निवड करण्यात आली.

परीक्षक मंडळ व पुरस्काराविषयी

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी प्रत्येक भाषेसाठी तीन सदस्यीय परीक्षक मंडळ कार्यरत असते. मराठी भाषेसाठी परीक्षक मंडळात निशिकांत ठाकूर, प्राची गुजरापध्याय-खंडेपारकर आणि निशा संजय डांगे यांचा समावेश होता.

या पुरस्कारांतर्गत ₹50,000/- रोख रक्कम आणि ताम्र प्रशस्तीपत्र प्रदान केले जाते. हा सन्मान लवकरच एका विशेष समारंभात दिला जाईल. सुदर्शन आठवले यांचा मराठीत सखोल अभ्यास असून, त्यांनी इंग्रजीतील महत्त्वपूर्ण साहित्य मराठीत आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक_तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’*जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे?* – मंदिर महासंघ

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त