vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

28 मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

 28 मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

 

रायगड प्रतिनिधी : अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांचे कार्यालया‌द्वारे दिनांक 28 मार्च रोजी दु. 02.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या डाक अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्यांचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्या टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बैंक, मनीऑर्डर संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत.

तसेच तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्‍छूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग ४०२२०१ यांचेकडे दि. 25 मार्च पर्यंत पोहचेल अश्या रीतीने पाठवावी. असे आवाहन सुनील थळकर, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग अलिबाग यांनी केले आहे.

00000Ç

संबंधित पोस्ट

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

शालेय सहलींतून एसटीला मिळाले १२७ कोटींचे उत्पन्न— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठीदि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

जिल्ह्यात  ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा