vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत कुटुंबातील एकाच महिलेला शिलाई मशीनचा लाभ – उद्योगमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबात एकाच महिलेला शिलाई मशीनचा लाभ दिला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यासाठी ठाणे येथील जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर निधी वितरीत करण्यात आला आहे. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याचा तपास करून एका कुटुंबात एकाच महिलेला शिलाई मशीनचा लाभ दिला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य किसन कथोरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्धी दिली गेली. नगरपरिषदेच्या सूचना फलकावरही जाहीर सूचना लावण्यात आली. विहित अटी व शर्तीनुसार प्रारूप अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह इच्छुक महिलांकडून अर्ज मागवण्यात आले. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची योजनेच्या अटी व शर्तीनुसार छाननी करण्यात आली. छाननी अंती पात्र व अपात्र महिलांच्या नावांची यादी तयार करण्यात आली. तसेच या सोडत प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांच्या नावाची गोपनीयता राखण्यासाठी केवळ अर्ज क्रमांकांचे एकत्रीकरण करून संगणकीय सोडत घेण्यात आली. प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे, तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचना व निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीचा विचार करून याचा तपास केला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

संबंधित पोस्ट

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल, मल्लखांब स्पर्धांच्या आयोजनाचा सांगलीला मान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला नियोजनाचा आढावा- 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा- स्पर्धांचे दर्जेदार आयोजन करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर