vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

जालना (प्रतिनिधी) ः मराठी व हिंदी भाषेत लेखन करणार्‍या रेखा बैजल यांच्या ‘अज्ञेय’ या हिंदी कादंबरीस महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘जैनेंद्र जैन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती मंजू लोढा यांच्या हस्ते 50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई येथील रंगशारदा भवन येथे संपन्न झाला.

यापूर्वी 27 फेब्रुवारीला मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य सभा मंडपामध्ये रेखा बैजल यांच्या ‘तुमचा आमचा संजू’ या बालकादंबरीस महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्य पुरस्कार प्रदान केला गेला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व भूतपूर्व संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याहस्ते 50 हजाराचा धनादेश, शाल व स्मृतिचिन्ह देऊन रेखा बैजल यांना गौरविण्यात आले. महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार हे या प्रसंगी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल रेखा बैजल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.

vishwatmaklokswamivarta

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कार्यालय सुसज्ज करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*