vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

बुलडाणा, प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी  विधानपरिषदेत माहिती दिली.अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर साकोरे बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य किशोर दराडे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, या केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याच्या तपासणीसाठी आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केसगळतीचे प्रकार कशामुळे घडत आहेत हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या गावांमधील लहान मुले तसेच गर्भवती महिला यांचीही आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच राज्यात शासानामार्फत अनेक योजना राबवण्यात येत असतात. त्यामध्ये लाभार्थ्यांना धान्य वाटपापासून शिवभोजन, मध्यान्न भोजन अशा योजनांचा समावेश आहे. अशा थेट अन्न धान्य आणि खाद्यांनांशी संबंधित योजनांच्या वाटपामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचा आणि खाद्यांन्नांचे वाटप होते की नाही याची तपासणी करण्यात येते. या खाद्यांन्नांच्या तपासण्या आणखी कडक करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. आश्रमशाळा तसेच शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान भोजनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही ठिकाणी यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री बोर्डीकर साकोरे यांनी सभागृहात सांगितले.0000

संबंधित पोस्ट

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*