vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ 6 महिन्याऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. या योजनेंतर्गंत प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ 11 महिने केल्यामुळे दि. 10 मार्च, 2025 किंवा त्यापूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे आधार सीडेड डीबीटी होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सीडींग करुन घ्यावेत.या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छुक असणाऱ्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, पडताळणी करुनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 10 मार्च, 2025 च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांकच योजनेच्या विद्यावेतन डीबीटीसाठी नमूद करणे आवश्यक आहे.

> प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Intern Login – Sign up – आधार नं. प्रविष्ट करणे – सेंड OTP -Verify OTP – The intern enters the received OTP – Successful Login and Access, Once OTP verification is successful, the intern gains access to the system याप्रमाणे पुर्ण करावी.

सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापनांनी आधार पडताळणी, कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी दि. 30 एप्रिल, 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयातील राहुल सुरडकर यांच्या 7972632828 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे 16 सप्टेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta