vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

 

नवी मुंबई प्रतिनिधी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 6 दिवस कोकण विभागात विविध कार्यक्रमांद्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 08 ते दि. 14 एप्रिल, 2025 या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार, कोकण विभागातही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कोकण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितली.

असे असतील सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम…सामाजिक न्याय विभागाने शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनेनुसार, कोकण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि.08 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह या कार्याक्रमाचे उद्घाटन.

दि. 09 एप्रिल रोजी कोकण विभागातील सर्व शाळा महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे बाबासोब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमांतून सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे

दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर या विशेष कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी सर्वसाधरण माहिती देणे तसेच संविधानाची निर्मिती, संविधान समिती, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये याविषयी माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करणे.

दि. 13 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.· चर्चासस्त्रे,लघुनाटय,शिबीरांचे आयोजन· लाभार्थ्यांना होणार लाभाचे वाटप· संविधाना होणार प्रसार वस्तामधून केली जाणार स्वच्छता· जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळणार ऑनलाईनदि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या कोकण विभागातील सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. याच दिवशी सर्व कोकण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.

कोकण विभागामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस आणि कार्यक्रमास मोठी उपस्थिाती होती.

000000000000000

संबंधित पोस्ट

*पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा राज्यात तिसरा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील* खरिप हंगामासाठी शंभर टक्के पीक कर्ज वितरण करा

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन 

श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार – कामगार मंत्री ॲड. फुंडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta