vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

 

जालना, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत बाल आधार नोंदणी व बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहिम दि.1 एप्रिल ते 30 जून 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांची नवीन आधार नोंदणी व 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील बालकांचे बायोमेट्रीक अद्ययावत करण्याचे उद्दीष्ट आहे. जिल्हा प्रशासन, महा-ई-सेवा केंद्र, शाळा, अंगणवाड्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या बालकांचे नवीन आधार नोंदणी तसेच आधार अद्यावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बाल आधार नोंदणी व बायोमेट्रीक अद्यावतीकरणाची मोहिम आधार केंद्रावर राबविली जाणार आहे. ज्यामध्ये शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील 0 ते 5 वयोगटातील बालकांची नवीन आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चांगले काम करणारे गाव पातळीवरील उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक महसूल विभागातून प्रथम तीन गावपातळीसाठी अनुक्रम 1 लाख रुपये, 50 हजार रुपये व 30 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील लाखो बालकांची आधार नोंदणी व आधार अद्ययावत प्रक्रिया शिल्लक असून ही मोहिम त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या मोहिमेमुळे बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

गुजरातमधील थर वाळवंटातील सर्वात मोठं नैसर्गिक जलस्थळ नळसरोवर इथं दुर्मीळ आर्क्टिक पक्षी ‘सॅबिन्स गल’ दिसून आला आहे! 🐦❄️

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना-उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय…साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल…

vishwatmaklokswamivarta

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta