vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

साथी पोर्टल कार्यप्रणाली व कीटकनाशक हाताळणीविषयी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

साथी पोर्टल कार्यप्रणाली व कीटकनाशक हाताळणीविषयी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) — कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे , कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व स्पेक्ट्रम इथर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सेवा केंद्र चालक, गुणनियंत्रण निरीक्षक तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांसाठी आयोजित करण्यात आलेले साथी पोर्टल कार्यप्रणाली आणि कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणी व फवारणीविषयीचे प्रशिक्षण दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल येथे यशस्वीपणे पार पडले.

मा. कृषी आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या कामकाजात डिजिटल प्रणालीचा अधिक कार्यक्षम वापर व्हावा तसेच शेतकऱ्यांपर्यंत सुरक्षित व गुणवत्तापूर्ण कृषी सेवा पोहोचाव्यात, या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणास कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, मोहीम अधिकारी महेश बनकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे, जिल्हा व्यवस्थापक, RCF विकास कांबळे, स्पेक्ट्रम इथर्स लिमिटेड उत्तम मगर, दीपक कोळी, हेमंत सूर्यवंशी, प्रतिनिधी, व्हिजन टेक सुहास पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशन समीर ठाकरे, तालुकास्तरावरील गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारी, जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी व विक्रेते उपस्थित होते. *साथी पोर्टल कार्यप्रणालीवर मार्गदर्शन*मोहिम अधिकारी श्री. महेश बनकर यांनी साथी पोर्टलवरील बियाणे साठवणूक, वितरण, विक्री प्रक्रियेची पद्धत याबाबत PowerPoint प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.

तसेच, बियाणे विक्री करताना येणाऱ्या अडचणी, पोर्टलवरील नोंदी कशा योग्यरीत्या कराव्यात, प्रणालीतील सामान्य समस्यांचे निराकरण, रब्बी व खरीप हंगामासाठी बियाणे विक्री करताना घ्यावयाची दक्षता याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले

*POS मशीनद्वारे खत विक्रीचे प्रात्यक्षिक*व्हिजन टेकचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी POS मशीनवर खत विक्री करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर प्रात्यक्षिक दिले. POS प्रणालीचा योग्य वापर करून पारदर्शक व अचूक खत-वितरण कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

*कीटकनाशक हाताळणी व फवारणीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन*स्पेक्ट्रम इथर्स लिमिटेडचे प्रतिनिधी हेमंत सूर्यवंशी यांनी कीटकनाशकांची सुरक्षित साठवणूक, फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर, अति, चुकीचा किंवा अनधिकृत कीटकनाशकांचा वापर टाळणे, वातावरण, वारा, तापमान यांचा फवारणीवरील परिणाम, दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वाचे सुरक्षा नियम या मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली.

कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी उपस्थित विक्रेत्यांना युरिया खत फक्त शेतकऱ्यांनाच विकावे, गैरशेती वापरासाठी खत विक्री आढळल्यास रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना दिल्या. तसेच कोकणातील पिकांसाठी शासन प्रमाणित कीटकनाशकेच विक्री करावीत. विक्री केंद्रांमध्ये कीटकनाशकांचा साठा सुरक्षित आणि नियमांनुसार ठेवावा असे मार्गदर्शन ही यावेळी केले.

*घडीपत्रिका व माहिती पुस्तिका विमोचन*या कार्यशाळेत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी’ या घडीपत्रिका व साथी पोर्टल माहिती पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सर्व विक्रेत्यांना फवारणी किट देखील वितरित करण्यात आले.

कार्यशाळेचे सुत्रसंचालन बी. डी. जावीर यांनी केले, तर भगवान पथारे, कृषी अधिकारी, शहापूर यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, विक्रेते आणि कृषी सेवा केंद्र प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी,एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’स्थापन करा-राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..